राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेत तात्पुरती स्थगिती
महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने https://stateexcise.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत होते.
लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क आणि चपराशी पदांच्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली आहे.
जवान हा संवर्ग राज्य स्तरीय संवर्ग घोषीत करून वाढीव पदे व रिक्त पदे एकत्रित करून भरती प्रक्रिया राबवने आवश्यक आहे.त्यामुळे ही भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते ग्राह्य धरले जातील.मात्र अर्जामध्ये तांत्रिक सुधारणा करणे आवश्यक असल्यास तश्या सुचना दिल्या जातील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
Comments
Post a Comment