Beed News- यापुढे ऊस तोडणीला जाऊ नका... बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे मजूरांना आवाहन. Beed news
Beed News: यापुढे ऊस तोडणीला जाऊ नका.... बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचे मजूरांना आवाहन.
![]() |
आपल्याला बीड जिल्हा हा व्यवसायिकांचा आणि विकसनशील शेतकऱ्यांचा जिल्हा करायचा आहे. |
Collector Deepa Mudhol News- बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्याला लागलेली ऊसतोड कामगाराची ओळख पुसण्याचा निर्धार बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपा मुधोळ या ऊसतोड कामगारांच्या महिलांसाठी आयोजित विविध मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शन करत आहेत. काय आहे दीपा मुधोळ यांची ही संकल्पना, जाणून घ्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ (Deepa Mudhol) या त्यांच्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ओळखल्या जातात. बेधडक अधिकारी अशी त्यांची खास ओळख आहे. सध्या त्यांनी बीड जिल्ह्याची अनेक वर्षांपासून असलेली ऊस तोड मजूरांचा जिल्हा ही ओळख मिटवण्याचा चंग बांधला आहे. ज्यासाठी त्या गेल्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगार महिलांसाठी आयोजित विविध मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शन करत आहेत.
या मेळाव्यांमधून "तुम्ही अगदी तुमच्या आजोबांच्या काळापासून ऊस तोडणीला जात आहेत. ऊस तोडणीला तुम्ही एकदम पैसे मिळतात म्हणून जातात. मात्र या पैशामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे का ? तुम्ही चांगले घर बांधलेत का ? शेतजमीन घेतली आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न विचारत तुम्ही इथंच रहा, प्रशासन तुम्हाला आवश्यक त्या सुविधा देईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments
Post a Comment